raid on illegal gas market
sakal
नाशिक - घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधील गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून काळाबाजार करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट एक व भद्रकाली पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत पर्दाफाश केला. या कारवाईत संशयित चौघांना अटक केली असून, तीन लाख १५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.