नाशिक: येथील मेजर (निवृत्त) पी. एम. भगत (वय ७९) यांचे बुधवारी (ता. ३०) सकाळी सातच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. त्यांनी १९७१ च्या पाकिस्तान युद्धात तसेच १९९९ च्या कारगिल युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. निवृत्तीनंतर रेडक्रॉस सोसायटी तसेच इतर विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी वैद्यकीय, सामाजिक, ग्राहक संरक्षण क्षेत्रात योगदान दिले.