Makar Sankranti 2026
sakal
नाशिक: तब्बल २३ वर्षांनंतर यंदा मकरसंक्रांत आणि षट्तिला एकादशीचा दुर्मिळ योग जुळून आल्याने यंदाची मकरसंक्रांत विशेष महत्त्वाची ठरणार आहे. असा योग पुन्हा थेट २०४५ मध्येच जुळून येणार असून, त्यापूर्वी हा योग १९८५, २००३, २००४ आणि यंदा २०२६ मध्येच जुळून आल्याची माहिती धर्मशास्त्राचे अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी दिली.