Kite Festival
sakal
नाशिक: हवेत झेपावणाऱ्या रंगीबेरंगी पतंगी...ढील देत इतरांना स्पर्धेसाठी दिलेले आव्हान.. एकमेकांचा मांजा खेचत पतंग कापताना लागलेली चुरस... असे उत्साहपूर्ण वातावरण बुधवारी (ता. १४) शहरात बघायला मिळाले. दिवसभर पतंगांनी आसमंत व्यापले होते. ‘गई बोल रे धिना’चा नारा ऐकू येत होता. संगीताच्या तालावर थिरकत अवघे कुटुंब पतंगोत्सवात रंगले होते.