मालेगाव: दाभाडी (ता. मालेगाव) येथील रोकडोबा हनुमान मंदिरातील शनि महाराजांच्या चांदीच्या मुकुटाची चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी यापूर्वी सटाणा व चांदवड येथे मंदिरात चोरी केलेल्या भावराव पवार (३५, रा. सावरगाव, येवला), भगवान पिंगळे (रा. शिंगवे, ता. चांदवड) या दोघांना अटक केली.