Chetan Ahire
sakal
मालेगाव: शहराजवळील चंदनपुरी गेट रस्त्यातील म्हाळदे फाटा वळणावर दुचाकी व कंटेनर (बीपी ६५ बीए ०३४४)चा अपघात होऊन तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत गृहरक्षक दलाचे जवान चेतन यशवंत अहिरे (वय २६) यांचा मृत्यू झाला. रविवारी (ता. ७) रात्री चेतन मुंबई-आग्रा महामार्गावरून आपल्या मूळगावी पाटणे येथे दुचाकीने जात असताना कंटेनरला धडक बसली.