घात - अपघात

घात - अपघात
Published on: 
चारचाकीच्या धडकेत ज्योत नेणाऱ्याचा मृत्यू मालेगाव : सौंदाणे शिवारात काळ्या रंगाच्या चारचाकीच्या धडकेत पायी ज्योत घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आनंद परमेश्वर पाटील (रा. भोरस खुर्द, ता. चाळीसगाव) हे महामार्गावरून देवीची ज्योत घेऊन पायी जात होते. १० ऑक्टोबरला दुपारी तीनला चारचाकीने (एमएच ०६ एएफ १८७७) त्यांना पाठीमागून धडक दिली. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहन सोडून पसार झाला. याबाबत राहुल रावसाहेब पाटील (रा. भोरस खुर्द) यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जेवणासाठी थांबलेल्या ट्रकचालकाचा मृत्यू मालेगाव : कोरेगाव (जि. सातारा) येथील राजकुमार वसंत बोधे (वय ५५) यांचा वऱ्हाणे शिवारात आकस्मिक मृत्यू झाला. ते आयशर ट्रकमधून (एमएच ११ डीव्ही २३७३) सोलर पॅनलचे साहित्य घेऊन साताऱ्याहून मालेगावला येत होते. ११ ऑक्टोबरला रात्री ते मयुर हॉटेल येथे जेवणासाठी थांबले. त्यानंतर तेथेच झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने क्लिनर रणजीत हनुमंत नलवडे (रा. कोरेगाव तळवे, जि. सातारा) यांनी पाहणी केली. बोधे बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना खासगी रुग्णवाहिकेतून सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. फैजी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू मालेगाव : मुंगसे फाट्याजवळ अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. फिरदोस सिकंदर गयासुद्दीन शेख (वय ५६, रा. सौंदाणे) हे होंडा शाइन दुचाकीने (एमएच ४१ बीसी १८५०) सौंदाणेकडे जात होते. त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिली. अपघातात शेख यांच्या पायाला व छातीला गंभीर मार लागला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संगमेश्वरात भागात पशुधन चोरीला मालेगाव : मोतीबाग नाका परिसरातील देवरे प्लॉट येथून सात हजार रुपये किमतीचा गोऱ्हा चोरीस गेला. संजय हिरामण जोपळे (वय ४७, रा. देवरे प्लॉट) यांचा गोऱ्हा घरासमोर बांधलेला होता. ११ ऑक्टोबरला दुपारी सव्वादोनच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्तींनी दोरीच्या साहाय्याने गोऱ्हा रिक्षात कोंबला. त्यानंतर ते गोऱ्हा घेऊन पसार झाले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. स्विफ्ट डिझायरची मालेगाव येथे चोरी मालेगाव : कलेक्टरपट्टा भागातून साडेचार लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार चोरीस गेली. संजय कारभारी देवरे (वय ४४, रा. वीर सावरकर नगर) यांची कार (एमएच १५ ईपी ७५८६) घराजवळ उभी होती. १० ऑक्टोबरला रात्री साडेदहापासून ११ ऑक्टोबरला सकाळी सातच्या दरम्यान चोरट्यांनी हॅन्डल लॉक तोडून कार लंपास केली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com