घात - अपघात

घात - अपघात
Published on: 
घात - अपघात सोयगावला तरुणाचा आकस्मिक मृत्यू मालेगाव ः येथील सोयगाव भागातील विलास नाना सूर्यवंशी (वय ४२, रा. वखारी मळी) यांची शनिवारी (ता. १४) रात्री साडेबाराला राहत्या घरात अचानक तब्येत बिघडली. पत्नी सुनीता सूर्यवंशी यांनी त्यांना येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉ. साद यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. ----- तरुणाचा मृत्यू मालेगाव ः भायगाव शिवारातील गौतम अशोक केदारे (वय ३५, रा. नवी वस्ती) रिक्षा चालवत असताना माळी समाज मंगल कार्यालयाजवळ त्यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांना प्रथम संगमेश्‍वर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रकृती खालावल्याने सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉ. पोतदार यांनी त्यांना मृत घोषित केले. १३ नोव्हेंबरला रात्री आठला हा प्रकार घडला. छावणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. ------ दुचाकीस्वार जखमी मालेगाव-मनमाड रस्त्यावरील मनमाड चौफुलीच्या पुढे कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. पारोळा (ता. जि. धुळे) येथील सचिन सूर्यभान केदार (वय २६) दुचाकीने जात असताना कारने त्याच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात सचिनच्या डाव्या हातास व डोक्यास मार लागून जखमी झाला. १३ नोव्हेंबरला सकाळी साडेनऊला हा अपघात झाला. किल्ला पाेलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध (नाव, गाव माहीत नाही) अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories