Nashik News : मालेगावला विनाहेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई; 2 दिवसात 75 हजार दंड वसुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Motor vehicle inspector giving flowers to drivers wearing helmets by Regional Transport Department here.

Nashik News : मालेगावला विनाहेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई; 2 दिवसात 75 हजार दंड वसुल

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांविरुध्द मोहीम उघडत कारवाई केली.

या कारवाईत दोन दिवसात शहर व परिसरात विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या दोनशे दुचाकीस्वारांवर कारवाई करून ७५ हजार रुपये दंड वसूल केला. (Malegaon action against helmetless bike drivers 75 thousand penalty recovery in 2 days Nashik News)

शहर व तालुक्यात दहा महिन्यात १५ टक्के अपघात झाले. यात विना हेल्मेट दुचाकी चालकांना प्राण गमवावे लागले. मोहीम सुरु करण्यापूर्वी ९ डिसेंबरला हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली होती. यात शहरातील १०० जणांनी सहभाग घेतला होता. रविवारी (ता.१) जानेवारीला येथे गिरणा पुलावर हेल्मेट घालणाऱ्या दुचाकी चालकांना गुलाबपुष्प देऊन त्याचे स्वागत करण्यात आले.

विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या चालकांना ई-चलन द्वारे दंड आकारण्यात आला. हेल्मेट जनजागृती करिता शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, मशिदीच्या वापर करण्यात आला असून त्यांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यात आले.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा: Malegaon Rap Song : मालेगावची ओळख सांगणाऱ्या रॅप सॉंगची धूम; महिलांसाठी खास निर्मिती

शहरात मौसम पूल, मसगा महाविद्यालया जवळ, गिरणा पूल, दरेंगाव नाका यासह विविध भागात विना हेल्मेट फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यासाठी येथे वायूवेग पथक, इंटर सेफ्टर वाहन हे दोन पथक नेमले असून त्यात १५ मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार निरीक्षिकाची नियुक्ती केली आहे.

दोन दिवसात येथे २०० विना हेल्मेट चालकांना दंड देण्यात आला आहे. महामार्गावर विना हेल्मेट चालविणाऱ्यावर इंटर सेफ्टर वाहन नेमण्यात येणार आहे.

"नागरिकांनी हेल्मेट वापरून स्वतःच्या जीवाचे रक्षण करावे. तसेच दंडात्मक कारवाईला टाळावे. वाहतूक नियमांचे पालन करावे. यापूर्वी हेल्मेट सक्तीसाठी जनजागृती करण्यात आली आहे."

- विनोद जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,

हेही वाचा: Nashik News : ताहराबाद सरपंच शीतल नंदन ठरल्या अपात्र! भ्रष्टाचार तपासणी अहवालात सिद्ध