मालेगावात स्वतंत्र एटीएस युनिट उभारण्याची मागणी राज्याचे मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे यांची एटीएस प्रमुख नवल बजाज यांच्याशी चर्चा

मालेगावात स्वतंत्र एटीएस युनिट उभारण्याची मागणी  राज्याचे मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे यांची एटीएस प्रमुख नवल बजाज यांच्याशी चर्चा
Published on: 
पान तीन ------------ 12270 मुंबई: मालेगावात एटीएस युनिट स्थापन करण्याची मागणीचे निवेदन अतिरिक्त पोलिस महासंचालक नवल बजाज यांना देताना ॲड. शिशिर हिरे. मालेगावात स्वतंत्र एटीएस युनिट उभारा ॲड. शिशिर हिरे यांचे मागणी; एटीएस प्रमुख बजाज सोबत चर्चा सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर, ता. १४ : शहराचे संवेदनशील स्वरूप आणि उत्तर महाराष्ट्रातील मध्यवर्ती भौगोलिक स्थान लक्षात घेता मालेगावात दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) स्वतंत्र युनिट व कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलिस महासंचालक नवल बजाज यांच्याशी चर्चा केली. मालेगावसह धुळे, जळगाव व नंदुरबार या चार जिल्ह्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मालेगावात स्वतंत्र एटीएस युनिट कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचे हिरे यांनी चर्चेदरम्यान निदर्शनास आणून दिले. २००६ आणि २००८ मध्ये मालेगाव शहरात झालेल्या दोन मोठ्या बॉम्बस्फोटांच्या घटनांमध्ये जीवित व वित्तहानी झाली होती. या पार्श्वभूमीवर शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष यंत्रणेची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. मालेगावचे भौगोलिक स्थान लक्षात घेता उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये सुरक्षा यंत्रणांना तातडीने संपर्क व समन्वय साधणे शक्य होईल. तसेच संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, संभाव्य दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करणे आणि आवश्यकतेनुसार त्वरित कारवाई करणे यासाठी स्वतंत्र एटीएस युनिट उपयुक्त ठरू शकते, अशी भूमिका हिरे यांनी मांडली. सध्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक येथे एटीएसचे पथक कार्यरत आहे. मात्र, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करावी लागणार आहे. त्यामुळे तेथील एटीएस यंत्रणेवर अतिरिक्त कामाचा ताण येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मालेगावात स्वतंत्र युनिट सुरू झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मिळेल, असेही हिरे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.