Tukaram Mundhe
sakal
नाशिक: दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट आदेश देऊनही मालेगाव येथील (कै.) त्रिवणीदेवी तुळशीराम पाटोदिया निवासी अंधशाळा आजही सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मान्यता रद्द करून शाळा सुरू ठेवल्यास तत्काळ सील व गुन्हा दाखल करण्याचे आदेश असतानाही प्रशासनाने डोळेझाक केल्याने शासनाच्या आदेशालाच केराची टोपली दाखविल्याचा गंभीर आरोप होत आहे.