Nashik News : मालेगावला वधू-वराचे हेलिकॉप्टरमधून आगमन; परिसरासह कसमादेतील पहिलीच घटना

Bandukaka Bachhao, Kamalakar Pawar etc. while welcoming the bride and groom from the tribal community who got off from the helicopter at the ground of Masaga college.
Bandukaka Bachhao, Kamalakar Pawar etc. while welcoming the bride and groom from the tribal community who got off from the helicopter at the ground of Masaga college.esakal
Updated on

Nashik News : आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण म्हणजे लग्न. लग्नाचा हा सोहळा अविस्मरणीय व्हावा म्हणून प्रत्येकजण काहीतरी खास प्रयत्न करतो. श्रीमंत व राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील लग्नसोहळ्यांना नवरदेव हेलिकॉप्टरवर विवाहस्थळी आल्याचे अनेकदा ऐकले आहे.

येथे आदिवासी समाजातील वधू-वर हेलिकॉप्टरमधून विवाहस्थळी आल्याची ही मालेगाव परिसरासह कसमादेतील पहिलीच घटना आहे. नव वधू-वरांचे हेलिकॉप्टरमधून येथील मसगा महाविद्यालयाच्या मैदानावर आगमन होताच त्यांचे बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव, अध्यक्ष कमलाकर पवार आदींसह वऱ्हाडींनी जल्लोषात स्वागत केले.

मैदानावरुन वधू-वर जीपमधून मिरवणुकीने समर्थ नगरमधील स्वप्नपरी लॉन्समध्ये विवाहस्थळी गेले. या वधू -वरांना पाहणाऱ्यांची मोठी गर्दी केली होती. (malegaon bride and groom arrive by helicopter first incident in Kasamada along with locality Nashik News)

मालेगावात झालेल्या आदिवासी समाजातील हा आगळावेगळा विवाह हेलिकॉप्टरमुळे चर्चेत आला. चंदनपुरी येथील आदिवासी समाजाचे नेते कैलास पवार यांची कन्या पूर्वी व लखमापूर (ता. बागलाण) येथील भुरा सोनवणे यांचे पूत्र लोकेश यांचा सोमवारी (ता.२४) विवाह थाटामाटात झाला.

बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव व कैलास पवार यांची २५ वर्षापासून मैत्री आहे. दोन वर्षापूर्वी बंडुकाकांच्या मुलीचा विवाह थाटामाटात व विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला.

माझ्या मुलीचे लग्न तुमच्या मुलीसारखेच आगळेवेगळे झाले पाहिजे अशी इच्छा श्री. पवार यांनी श्री. बच्छाव यांच्याकडे व्यक्त केली. त्यामुळे हा विवाह आगळावेगळा करण्यासाठी हेलिकॉप्टरचा खर्च बंडूकाका बच्छाव व बारा बलुतेदार मित्र मंडळाने करत दोन वर्षापूर्वी दिलेला शब्द खरा ठरविला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सप्तशृंगगडावर आदिमाया सप्तशृंगीदेवीचे नववधु आणि वर यांनी सकाळी दर्शन घेतले. नांदुरी येथून वधु-वरांना घेऊन हेलिकॉप्टर मालेगावला आले. मसगा महाविद्यालयाच्या मैदानावर ढोल, ताशे व डिजेच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. येथून जीपमधून मिरवणुकीने वधू-वर विवाहस्थळी गेले. यावेळी राष्ट्रीय एकात्मता जोपासत विविध

जाती-धर्माच्या प्रतिनिधींचा फेटे घालून सन्मान करण्यात आला. आदिवासी समाजातर्फे बंडुकाकांच्या अनोख्या दातृत्वाबाबत कौतुक केले.

"आजवर श्रीमंत, राजकारणी, उद्योगपती आदींचे जावई हेलिकॉप्टरने येतात. आदिवासी समाजाचा जावई हेलिकॉप्टरने विवाहस्थळी आला ही आनंदाची बाब आहे. मुलीचा आगळावेगळा विवाह झाला पाहिजे ही आदिवासी मित्राची इच्छा पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद आहे."

- बंडूकाका बच्छाव संस्थापक, बारा बलुतेदार मित्र मंडळ

Bandukaka Bachhao, Kamalakar Pawar etc. while welcoming the bride and groom from the tribal community who got off from the helicopter at the ground of Masaga college.
Nashik News : जामुंडे गाव प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प; तालुका पर्यावरण मंडळाचा उपक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.