Bull Swallows Gold Necklace : अंगावर काटा आणणारी घटना! बैलाच्या पोटात सापडली 3 तोळ्यांची सोन्याची पोत आणि प्लास्टिकचे गोळे; एक्स-रे काढल्यावर डॉक्टरही चकित

Bull Swallows Three-Tola Gold Necklace During Bail Pola : मालेगावच्या वनपट येथे बैलपोळ्याच्या नैवेद्यासोबत बैलाने तीन तोळ्यांची सोन्याची पोत गिळली. क्ष-किरण तपासणीनंतर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी पोत सुरक्षितपणे बाहेर काढली.
bull swallowed gold necklace

bull swallowed gold necklace

esakal

Updated on

मालेगाव कॅम्प : बैलपोळ्याच्या दिवशी पुरणपोळीच्या नैवेद्यासोबत वनपट (ता. मालेगाव) येथील बैलाने चक्क तीन तोळ्यांची सोन्याची मंगळसूत्राची पोत गिळली. दोन बैलांपैकी नेमक्या कोणत्या बैलाने पोत गिळली, हे स्पष्ट नसल्याने शेतकरी कुटुंबाची चिंता वाढली. चाळीसगाव येथील तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयातील डॉक्टरांनी क्ष-किरण तपासणी केली. त्यातून पोत नेमक्या कोणत्या बैलाच्या पोटात आहे, हे स्पष्ट झाले. त्यानंतर शस्त्रक्रिया करून सोन्याची पोत बाहेर काढण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com