परिचारिकेस शिवीगाळ व धमकी

परिचारिकेस शिवीगाळ व धमकी
Published on: 
फोटो 16048 मालेगाव कॅम्प : हारून अन्सारी रुग्णालयात परिचारिकेस शिवीगाळ करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन उपायुक्त सुनीता कुमावत यांना देताना परिचारिका मीनाक्षी जगताप व कर्मचारी. --- परिचारिकेला शिवीगाळ, ठार मारण्याची धमकी दहा दिवस उलटूनही कारवाई नाही; सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा मालेगाव कॅम्प, ता. ५ : येथील हारून अन्सारी रुग्णालयातील परिचारिका मीनाक्षी जगताप यांना रुग्णाच्या नातेवाइकांनी शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. तब्बल १० दिवस उलटूनही संबंधित व्यक्तींवर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन म्युनिसिपल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपाच्या उपायुक्त सुनीता कुमावत यांना दिले आहे. हारून अन्सारी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व म्युनिसिपल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपायुक्तांना निवेदन सादर केले. शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या रुग्णाच्या नातेवाइकावर गुन्हा दाखल करावा, तसेच रुग्णालयात रात्री-अपरात्री येणाऱ्या नातेवाइकांना पायबंद घालावा, रुग्णालयात सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, अशा घटना वारंवार घडत आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मुन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष भारत बेग यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या वेळी परिचारिका मीनाक्षी जगताप, रंजना देवरे, ज्योती वनगुट, मोनालीसा मोहन आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com