डोंगराळे बालिका अत्याचार प्रकरणी आज महत्वपुर्ण सुनावणी

डोंगराळे बालिका अत्याचार प्रकरणी आज महत्वपुर्ण सुनावणी
Published on: 
बालिका अत्याचारप्रकरणी आज महत्त्वपूर्ण सुनावणी सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. ६ : डोंगराळे (ता. मालेगाव) येथील सव्वाचार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून करदोड्याने गळा आवळून खून केल्याप्रकरणी विजय ऊर्फ शेखर खैरनार (वय २५) याला येथील जलदगती न्यायालयाने दोषी ठरविले आहे. १६ नोव्हेंबर २०२५ ला घडलेल्या या प्रकरणातील खटला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयात सुरू आहे. आरोपीच्या शिक्षेबाबत बुधवारी (ता. ७) सुनावणी होण्याची शक्यता आहे. ३० सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने खैरनारला अत्याचार आणि खुनाच्या आरोपांत दोषी ठरविले. त्यानंतर आरोपीचे गावातील वर्तन, तसेच अटकेपासून तुरुंगातील वर्तन याबाबतचा अहवाल न्यायालयाने मागविला आहे. याशिवाय मानसोपचारतज्ज्ञांचा अहवालही मागविण्यात आला आहे. विशेष सरकारी वडील ॲड. उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षातर्फे न्यायालयात अर्ज सादर केला आहे. त्यानुसार आरोपीची वैद्यकीय अधिकारी व मानसोपचारतज्ज्ञांकडून तपासणी करून त्याबाबतचा अहवाल मागविण्यात आला आहे. आरोपीचे गावातील वर्तन आणि अटकेनंतरचे तुरुंगातील वर्तन याबाबतचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडून सादर केला जाणार आहे. तुरुंगाधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ आणि परिवीक्षा अधिकारी (प्रोबेशन ऑफिसर) यांचे अहवाल बुधवारी न्यायालयात सादर होण्याची शक्यता असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या साक्षीही नोंदविल्या जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून शिक्षेच्या मुद्द्यावर युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारीच या प्रकरणाचा अंतिम निकाल लागण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. या सुनावणीकडे तसेच न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com