Ujjwal Nikam
sakal
मालेगाव: डोंगराळे येथील सव्वाचार वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार व निर्घृण हत्या प्रकरणाचा खटला शक्य तितक्या लवकर पूर्ण करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी दिली. या खटल्याची सुनावणी मालेगाव येथील जलदगती न्यायालयात होणार असून, सोमवारपासून (ता. १९) साक्षीदारांची तपासणी सुरू होणार आहे.