भाग्यश्री विसपुते यांनी स्विकारला प्रभारी आयुक्त पदाचा पदभार

भाग्यश्री विसपुते यांनी स्विकारला प्रभारी आयुक्त पदाचा पदभार
Published on: 
पान-३ फोटो -16192 मालेगाव : अधिकाऱ्यांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त भाग्यश्री विसपुते ----- जिल्हाधिकारी विसपुतेंकडे मालेगावचा प्रभारी पदभार सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता.३१ : धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी मालेगाव महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. श्रीमती विसपुते या मालेगावातील संगमेश्‍वर भागातील असून त्यांचे शिक्षण देखील मालेगाव शहरातच झाले आहे. त्यांना मालेगावातील परिस्थितीची जाण आहे. जिथे जन्म झाला, त्याच गावाच्या प्रभारी आयुक्तपदी काम करण्याची संधी मिळणे हा शुभ योगायोग मानला जात आहे. त्यांच्याकडून शहरातील नागरिकांच्या अपेक्षा असल्या तरी, त्यांच्याकडील पदभार शासन किती दिवस ठेवते हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांनी महापालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर महापौर, उपमहापौर, उपायुक्त यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी खातेप्रमुखांची बैठक घेत त्यांना स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, भूमिगत गटार योजना, नगर रचना या विभागाची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. शेख मोहम्मद तौसिफ, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे, नगरसचिव साजिद अन्सारी, साहाय्यक आयुक्त अनिल पारखे, दिनेश मोरे, नवल खैरनार, इ-प्रशासन विभाग प्रमुख सचिन महाले, लेखापरीक्षक शाम बुरकुल, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, अधीक्षक मोहम्मद इरफान, प्रभाग अधिकारी बळवंत बाविस्कर, संतोष गायकवाड, अलीम देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री आहेर, प्रमुख स्वच्छता निरीक्षक आनंदसिंग पाटील, इकबाल जान मोहम्मद, विद्युत अधिक्षक संतोष अहिरे, जनगणना विभाग प्रमुख सचिन भामरे, लेखा विभागाचे वरिष्ठ लिपिक हाफिज अन्सारी, लिपिक सनी पवार उपस्थित होते. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.