घात - अपघात

घात - अपघात
Published on: 
मालेगावला गळफास घेत युवकाची आत्महत्या मालेगाव : येथील रमजानपुरा भागातील राहुल भारत जाधव (वय २७, रा. द्याने) याने १७ ऑक्टोबरला रात्री साडेअकराला घराच्या छाताच्या बल्लीला मफलरच्या सहाय्याने गळफास घेतला. नातेवाईक सचिन जाधव यांनी त्याला येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. आशिष यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. द्याने रमजानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यची नोंद झाली आहे. ------ मुंगसे शिवारात महिलेची पोत लंपास मालेगाव : मुंगसे (ता. मालेगाव) शिवारात शेत गट नं. ११७/३ मध्ये देविदास संजय सुर्यवंशी (वय ३५) यांची आई कांद्याची रोपे कॅरेटमध्ये भरुन डोक्यावर वाहून नेत असतांना तिच्या गळ्यातील १ लाख २२ हजाराची सोन्याची पोत दिल्या भत्या (रा. पाटणे) याने त्यांच्या पाठीमागून येवून महिलेचे तोंड दाबून सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून नेली. देविदास सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ----- जाटपाडे भागात दोन लाखाची घरफोडी मालेगाव : जाटपाडे (ता. मालेगाव) येथील कल्पेश कैलास रसोडा (वय ३५) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यांच्या वडीलांच्या पँटमधील ५० हजार रोख तसेच आईच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या माळा असा एकूण १ लाख ७० हजाराचा ऐवज चोरुन नेला. १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सव्वा ते दीडच्या दरम्यान ही घरफोडी झाली. तालुका पोलिस ठाण्यात तिघाविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. ----- पतीची पत्नीला जेऊर येथे मारहाण मालेगाव : जेऊर (ता. मालेगाव) शिवारातील पुजा संदिप खैरनार (वय २८, हल्ली रा. मोरझर, ता. नांदगाव) हिला पती संदिप शिवाजी खैरनार (रा. जेऊर) याने वैद्यकीय उपचाराचा खर्च वाढल्याच्या कारणामुळे कुरापत काढून शिवीगाळ केली. लोखंडी फावडीच्या दांड्याने पुजाच्या शरीरावर ठिकठिकाणी मारुन जखमी केले. तसेच तिच्या आई, वडिल व भावांना फोन करुन शिवीगाळ केली. तसेच जीवे ठार मारण्याचा दम दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुजाच्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात संदिप खैरनार याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com