घात - अपघात

घात - अपघात
Published on: 
सोयगाव येथे दुचाकी लंपास मालेगाव : सोयगाव भागातील सोनम राजू सोदे (वय ३५, रा. बोरसे नगर) यांची ५० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच ४१ बीक्यू ०११८) चोरट्यांनी लंपास केली. ७ ऑक्टोबरला रात्री साडेदहाला घरासमोर हँडल लॉक करून दुचाकी उभी केली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे चारला ती चोरीला गेल्याचे आढळले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बाजरीचे कणसे चोरीप्रकरणी मालेगावला तिघांविरुद्ध गुन्हा मालेगाव : मथुरपाडे शिवारातील शेतातून १५ हजार रुपये किमतीचे सहा क्विंटल बाजरीचे कणसे चोरल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. समाधान दशरथ पवार (वय ५१, रा. मोतीबाग नाका) यांच्या शेतातून १३ ऑक्टोबरला सकाळी अकराला हा प्रकार घडला. सुरेश सोनू पवार, रामा सोनू पवार व चंद्रभान सोनू पवार (सर्व रा. मथुरपाडे) यांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीतून कणसे नेली. यावेळी दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सौरऊर्जा प्रकल्पाची सहा लाखांची केबल चोरी मालेगाव : दहिकुटे-टोकडे रस्त्यावरील टोकडे शिवारातील २३ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पातून सहा लाख २४ हजार ७५० रुपये किमतीची डीसी स्ट्रिंग केबल चोरट्यांनी लंपास केली. १० हजार ५०० मीटर केबल चोरीला गेली. ४ ऑक्टोबरला रात्री साडेबारा ते ५ ऑक्टोबरला सकाळी आठदरम्यान हा प्रकार घडला. साइट इंजिनिअर गोकुळ इप्पर यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कारच्या धडकेत डाबलीत दोघे जखमी मालेगाव : तालुक्यातील डाबली मोरीजवळ कारने धडक दिल्याने दोन पादचारी जखमी झाले. एकनाथ सुरेश पवार (वय १८, रा. डोंगराळे) व त्यांचे मित्र अमोल खैरनार हे १३ ऑक्टोबरला सायंकाळी सातला डाबली मोरीजवळून पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कारने (एमएच ०२ ईझेड ५१५३) दोघांना धडक दिली. याप्रकरणी एकनाथ पवार यांच्या तक्रारीवरून वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात कारचालक आबा आप्पाजी वाणी (रा. ढवळेश्वर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com