लक्ष्मी पूजनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात साहित्य खरेदीचा उत्साह,पूजेचे साहित्य महागले

लक्ष्मी पूजनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात साहित्य खरेदीचा उत्साह,पूजेचे साहित्य महागले
Published on: 
पान तीन मेन ------------- 16211, 16212 मालेगाव : रावळगाव नाक्यावर लक्ष्मी पूजनानिमित्त लक्ष्मीमूर्ती, केरसुणी व पणती खरेदीसाठी झालेली गर्दी. दुसऱ्या छायाचित्रात लक्ष्मी पूजनानिमित्त विक्रीसाठी दाखल झालेल्या लक्ष्मी मूर्ती. दिवाळीनिमित्ताने साहित्य खरेदीचा उत्साह मुख्य बाजारपेठांसह कापडा, किराणा बाजारात गर्दी; पुजा साहित्याच्या दरात वाढ सकाळ वृत्तसेवा मालेगाव कॅम्प, ता. ६ : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात लक्ष्मी मूर्ती, लक्ष्मीचे प्रतीक असलेली केरसुनी, पणती, रांगोळी, बत्तासे आदींसह साहित्य खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असली पूजा साहित्य, फराळ आदी वस्तू खरेदीला गर्दी उसळली आहे. मुख्य बाजारपेठांसह कापड व किराणा बाजारात लक्षणीय उलाढाल होत आहे. खरेदीसाठी वर्दळ वाढल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. लक्ष्मीमूर्तीचे व पूजेच्या साहित्यांचे ठिकठिकाणी स्टॉल लागले आहेत. ७० ते ४५० रुपयापर्यंत लहान, मोठ्या आकाराच्या मूर्ती विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. लक्ष्मी पूजनाला केरसुणीला लक्ष्मी मानत तिची पूजा केली जाते. ३० ते २०० रुपये किमतीच्या छोट्या मोठ्या आकाराच्या केरसुण्या विक्रीसाठी आल्या आहेत. ५० रुपये डझनप्रमाणे मातीच्या पणत्या मिळत आहेत. लक्ष्मीपूजनासाठी अवघा एक दिवस उरला आहे. त्यामुळे बाजारात साहित्य खरेदीची महिलांची लगबग व वर्दळ दिसून येत आहे. शहरातील रावळगाव नाका, चर्च, सटाणा नाका, मोसम चौक, महात्मा फुले रोड, रामसेतू पुल, गूळ बाजार, सरदार चौक आदी भागात पूजेच्या साहित्याची दुकाने सजली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सोने, चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहने खरेदी केली जात आहेत. एकूणच दीपोत्सवात आर्थिक उलाढालीत लक्षणीय वाढ झाली आहे. ----- लक्ष्मीपूजन एक दिवसावर असल्याने पूजेचे साहित्य व लक्ष्मी मूर्ती खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. दुष्काळी परिस्थितीतही पूजेचे साहित्य, लक्ष्मी मूर्ती, केरसुणी खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह कायम आहे. लक्ष्मीमूर्तींच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कमळ, दिव्यातील रंगीबेरंगी आकाराच्या आकर्षक मूर्ती उपलब्ध आहेत. - विक्रम मोरे, मूर्ती विक्रेता, मालेगाव कॅम्प