मालेगाव- शहरात सलग दोन दिवसापासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे येथील पूर्व भागातील आझादनगर व आयुबनगर भागांमध्ये रस्ते व गल्ल्यांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. गटारीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने या समस्यांचा सामना शहरातील पूर्व भागातील नागरीकांना करावा लागतो. येथील गटारींची गेल्या वर्षभरापासून स्वच्छ केली जात नाही. तसेच गटारीत मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा साचलेला असतो. त्यामुळे गटारी बंद होतात.