Malegaon Highway Protest
sakal
मालेगाव कॅम्प: राष्ट्रीय महामार्गावर टेहरे गावाजवळ बोगद्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. १७) सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम बंद पाडले. अपघाताचा ब्लॅक स्पॉट सोडून दुसऱ्याच जागेवर उड्डाणपूल होत आहे. वारंवार मागणी करूनही टेहरे बसस्थानकाजवळ बोगदा होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी उड्डाणपुलाचे काम बंद पाडले. मागणी मंजूर होईपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, अशी ठोस भूमिका त्यांनी घेतली आहे.