20 Tons of Illegal Timber Seized Near Kaulane Phata
sakal
मालेगाव: मालेगाव - मनमाड रस्त्यावरील कौळाणे फाट्याजवळ स्थानिक गुन्हे शाखा मालेगाव युनिट व मालेगाव वन पथकाने संयुक्त कारवाई करत २० टन लाकडाचा साठा आणि अवजड ट्रक असा एकूण ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ट्रकच्या दोघा चालकांनाही वन विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुमारे ४० लाख रुपयाचे खैराचे लाकूड ट्रकमध्ये होते.