मालेगाव तालुक्यात महसूल सेवक पदासाठी आजपासून भरणार अर्ज

मालेगाव तालुक्यात महसूल सेवक पदासाठी आजपासून भरणार अर्ज
Published on: 
मालेगाव, बागलाण तालुक्यांत आजपासून कोतवाल पदासाठी भरती सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २ : मालेगाव तालुक्यातील १४ सजांमध्ये महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या भरती प्रक्रियेस शनिवार (ता. ३)पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करावा, असे आवाहन प्रांताधिकारी नितीन सदगीर यांनी केले. तालुक्यातील माल्हणगाव, झोडगे, घाणेगाव, सायने बुद्रुक, सौंदाणे, दाभाडी, अजंग, चंदनपुरी, चिंचगव्हाण, भिलकोट, राजमाने, वाके, सोनज, शेरूळ या सजांमध्ये कोतवालच्या जागा रिक्त आहेत. यात विविध प्रभागातून अर्ज मागविण्यात आले आहेत. १४ सजांमध्ये झोडगे, सायने बुद्रुक, चंदनपुरी, शेरूळ येथे समांतर महिलांसाठी जागा रिक्त आहे. या पदासाठी शनिवारी (ता. ३) सकाळी दहापासून ते १७ ऑक्टोबर सायंकाळपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन कागदपत्रांसह अर्ज करावा. बागलाण तालुक्यात महसूल सेवकच्या २६ रिक्त जागा असून, २९ सप्टेंबरला तहसील कार्यालयात सोडतीद्वारे पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असल्याची माहिती समिती अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी महेश शेलार यांनी दिली. २६ पदांमध्ये अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जमाती, एसईबीसी, ईडब्ल्यूएस आणि खुल्या प्रवर्गानुसार सजानिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. ३ ते १७ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन अर्ज, ४ ते १० नोव्हेंबरदरम्यान प्रवेशपत्र उपलब्ध होणार असून, १५ नोव्हेंबरला लेखी परीक्षा होईल. १६ नोव्हेंबरला उत्तरसूची व निकाल, १७ ते २७ नोव्हेंबरदरम्यान कागदपत्र पडताळणी, तर २८ नोव्हेंबरला नियुक्तिपत्र वाटप नियोजित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com