Malegaon News : मालेगावला कुलूप तोडून महालक्ष्मी मंदिरात महाआरती
Protest Over Locking of Mahalaxmi Temple in Malegaon : मालेगावमधील ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर बंद केल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने कुलूप तोडत महाआरती केली. मंदिर बंदीवरुन वाद निर्माण झाला आहे.
मालेगाव- शहरातील गूळ बाजार भागातील सोमवार वॉर्डातल्या नारोशंकर राजेबहादूर यांनी स्थापलेल्या महालक्ष्मी मंदिराचे कुलूप तोडून तेथे महाआरती करण्याचा प्रकार आज सायंकाळी घडला. तत्पूर्वी, आयुक्तांना इशारेवजा निवेदनही देण्यात आले होते.