मालेगाव- टेहेरे (ता. मालेगाव) येथे बुधवारी (ता. ११) रात्री साडेदहाच्या सुमारास महिंद्रा एक्सयुव्ही कारने (एमएच ०२, सीएल ८३१६) दोन दुचाकींना जबर धडक दिली. अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले. तसेच कारचालकाने विरुध्द बाजूला जावून समोरील विद्युत खांबाला जबर धडक दिली. यात मुंगसे येथील शेखर अहिरे या डॉक्टराचा मृत्यू झाला.