Malegaon Market Committee Election : आपलं पॅनलला कपबशी तर कर्मवीर हिरे पॅनलला गॅस सिलिंडर

Market Committee nashik
Market Committee nashikesakal

Nashik News : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ जागांसाठी ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्या ‘आपलं’ पॅनलला कपबशी तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखालील ‘कर्मवीर भाऊसाहेब हिरे’ पॅनलला गॅस सिलिंडर हे चिन्ह देण्यात आले. (Malegaon Market Committee Election cup saucer for apla panel and gas cylinder for Karmaveer Hire panel This symbol was given nashik news)

शुक्रवारी (ता.२१) उमेदवारांच्या चिन्ह वाटपासह निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांच्याकडे दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी पॅनलला एकच चिन्ह मिळावे यासाठी बंद लिफापा चिन्ह कळविले होते. यातील प्राधान्य क्रमानुसार पॅनलच्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.

आपलं पॅनलने सर्वच्या सर्व १८ जागांवर उमेदवार दिले आहेत. कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलने व्यापारी व हमाल मापारी गट वगळता १५ जागांवर उमेदवार दिले आहेत. याशिवाय १३ जागांवर अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यांना वेगवेगळे चिन्ह देण्यात आले आहेत. यातील शेखर पवार या अपक्ष उमेदवाराला कांदा हे निवडणूक चिन्ह मिळाले.

बाजार समिती निवडणुकीच्या नऊ गटांपैकी सहकारी संस्था महिला राखीव, सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग व ग्रामपंचायत सर्वसाधरण अशा तीन गटात सरळ लढत होत आहेत. सहकारी संस्था महिला राखीव गटातील दोन जागांसाठी आपलं पॅनलच्या भावना निकम, शोभाबाई पवार व कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलच्या मिनाक्षी देवरे, भारती बोरसे अशी सरळ लढत होत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Market Committee nashik
Market Committee Election : राष्ट्रवादी-शिवसेनेला कपबशी तर सर्वपक्षीय पॅनलला छत्री; उमेदवारांना चिन्हांचे वाटप

सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग गटातील एका जागेसाठी आपल पॅनलचे चंद्रकांत शेवाळे व कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलचे युवराज गोलाईत तर ग्रामपंचायत सर्वसाधरण गटातील दोन जागांसाठी आपलं पॅनलचे राजेंद्र पवार, कृष्णराव ठाकरे व कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलचे रवींद्र सूर्यवंशी, रत्ना पगार अशा सरळ लढती होत आहेत.

सहकारी संस्था सर्वसाधारण गटात पाच अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. सहकारी संस्था भटक्या विमुक्त जाती जमाती गटात महेश शेरेकर हे अपक्ष उमेदवार आहेत. तर ग्रामपंचायत गटातील अनुसूचित जाती जमाती गटात मोतीराम वानखेडे अपक्ष उमेदवार आहेत. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक गटात नारायण कळमकर अपक्ष असून व्यापारी गटात रौफ खान, सुरेश झाल्टे, प्रवीण पाटील अपक्ष उमेदवार आहेत. हमाल मापारी गटात रवींद्र साळुंके व किसन वाघ हे अपक्ष उमेदवार आहेत.

Market Committee nashik
Chhagan Bhujbal : आरोग्य विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय प्रत्यक्ष काम लवकर सुरवात होण्याची गरज : भुजबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com