मालेगाव- व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीच्या वक्तव्याचा निषेध करीत सभापतींच्या राजीनाम्याची मागणी करीत बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बुधवारी (ता. २) शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यापाऱ्यांशी फोनवर चर्चा केल्यानंतर शनिवारी (ता. ५) अंतिम बैठक होणार आहे. या बैठकीला व्यापारी व सभापती आमने-सामने असतील. त्या वेळी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितल्यावर व्यापाऱ्यांनी एकमताने बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला.