मालेगाव- येथील एका नामांकित खासगी रुग्णालयात नर्सिंग कोर्सचे प्रशिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस मोबाईलवर तिचा सेल्फी घेतलेला फोटो दाखवून ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. विशेष म्हणजे रुग्णालयात काम करणाऱ्या ब्रदरनेच अत्याचार केला. या प्रकरणी संशयित मोहम्मद अथर खुर्शीद अहमद (वय ३१, रा. गुरुवार वॉर्ड, मालेगाव) यास पोलिसांनी अटक केली. या घटनेचे पडसाद शहरात सर्वत्र उमटले असून, निषेध करण्यात येत आहे.