दुचाकीस्वार चोरट्यांचा सुळसुळाट, खिशातील ''मोबाईल''वर डल्ला

दुचाकीस्वार चोरट्यांचा सुळसुळाट, खिशातील ''मोबाईल''वर डल्ला
Published on: 
पान तीन मेन --------------------------- 12273 मालेगाव शहर: तालुका पोलिस प्रशासनातर्फे ग्रामीण भागात सोशलमीडियावर जनजागृती करणारे चित्र. मालेगाव शहरात दुचाकीस्वार चोरट्यांचा सुळसुळाट चालत्या बाईकवरून मोबाईल लांबविण्याच्या प्रकारांत वाढ सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर, ता. १४ : शहरात दुचाकीस्वार चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, डबलसीट दुचाकीवरून येऊन नागरिकांच्या खिशातील किंवा हातातील ''मोबाईल'' चोरण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहरातील शहराबाहेर जाणाऱ्या मुख्य रस्त्यांसह अनेक निर्मनुष्य रस्ते या चोरट्यांनी आपले मुख्य लक्ष केले आहेत. विशेषतः दिवाळी सणाच्या निमित्ताने परतीच्या प्रवासात असलेल्या, तसेच दैनंदिन सकाळी व सायंकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या शर्टाच्या वरच्या खिशातील मोबाईल चोरून पळण्याचे प्रकार वाढले आहेत. आता तर चक्क हातातील मोबाईल हिसकावून बाईकवर फरार होत असल्यामुळे आरोग्यदायी फेऱ्यांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील चाळीसगाव फाटा परिसर, मनमाड चौफुली, महामार्ग, सटाणा-दाभाडी रोड, कॅम्प-दाभाडी रोड, सोमवार बाजार परिसर, दौलती इंग्लिश स्कूल परिसर, नामपूर रोड आणि मन्सुरा ते शालीमार चंदनपुरी रस्ता या भागात भरधाव येऊन मोबाईल चोरून नेण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. तक्रार देण्यास टाळाटाळ सण-सुट्यांचा फायदा घेत मोबाईल चोरीचे नवे प्रकार पोलिस यंत्रणेपुढील मोठे आव्हान ठरत आहेत. मोबाईल ही आजच्या काळात सर्वसामान्य नागरिकांची दैनंदिन गरज बनली आहे. त्यामुळे चोरीला गेलेला मोबाईल शोधण्यासाठी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यापेक्षा नागरिक नवीन मोबाईल खरेदी करणे पसंत करतात. याचाच गैरफायदा चोरटे घेत आहेत. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाला वेग देण्यासाठी शहरातील मुख्य चौकांमध्ये व रस्त्यांवर सीसीटीव्ही बसवावेत, अशी आग्रही अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता आपला मोबाईल सुरक्षित ठेवावा. शर्टच्या वरच्या खिशात मोबाईल ठेवणे किंवा रस्त्याने चालताना फोनवर बोलणे टाळावे. आसपासच्या परिसरात तोंडावर रुमाल बांधलेल्या संशयास्पद व्यक्तींपासून सावधानता बाळगावी, कोणावर संशय असल्यास पोलिसांना कळवावे. - रघुनाथ शेगर, पोलिस निरीक्षक, तालुका पोलिस स्टेशन नागरिकांनी आपला मोबाईल हमेशा पँटच्या किंवा जॅकेटच्या खालच्या खिशात ठेवावा आणि इतरांनाही जागरूक करावे. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास मोबाईलमधील डेटाचा गैरवापर झाल्यामुळे येणाऱ्या अडचणी टाळता येतात. तसेच स्वस्त मिळतो म्हणून जुने किंवा चोरीचे मोबाईल खरेदी करणे तातडीने बंद करावे. अमोल महाडीक, सामाजिक कार्यकर्ते, देवारपाडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories