मालेगाव- येथील मोसम नदीपात्रातील रक्त मिश्रित पाण्याचा प्रश्न विधानसभा अधिवेशनात गाजला. अधिवेशनात आमदार विक्रांत पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधले. आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील हा प्रश्न उपस्थित केला. मंत्री उदय सामंत यांनी बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.