भरदिवसा दुचाकी
मालेगावला चोरी
मालेगाव : जाफरनगर येथील अमजद शेख अब्दुल्ला (वय २३) यांची ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १५ एफएक्स ९३८०) चोरट्यांनी लांबविली. २५ सप्टेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास बिसमिल्ला हॉटेलसमोरील रस्त्यावरून ही दुचाकी चोरीस गेली. याप्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एक लाख रुपयांसाठी
विवाहितेचा छळ
मालेगाव : दुकान सुरू करण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनस मोहम्मद अझरुद्दीन (वय २०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती मोहम्मद अझरुद्दीन याच्यासह चौघांनी ७ एप्रिल २०२५ ते २३ मार्च २०२६ या कालावधीत शिवीगाळ, दमबाजी व मारहाण केली. तसेच घरातून हाकलून दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दत्तनगरातून
तरुणी बेपत्ता
मालेगाव : दत्तनगर भागातील सफिनाबानो शब्बीर अहमद (वय १६) ही तरुणी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिचे वडील मोहम्मद शब्बीर मोहम्मद अली यांनी दिली आहे. शनिवारी (ता. ३) दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.