Nashik News : महानगरपालिकेची थकबाकीदारविरोधात कारवाई; शहरातील 128 नळजोडण्या केल्या खंडित

Municipal Corporation employees disconnecting water supply in Sweeper Colony area
Municipal Corporation employees disconnecting water supply in Sweeper Colony areaesakal

मालेगाव (जि. नाशिक) : महानगरपालिका प्रशासनाने मार्चअखेर आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर, घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम सुरु केली आहे. मोहिमेत मालमत्ता कर थकबाकीदारांविरुध्द नळजोडण्या खंडित करणे, जप्ती यासह विविध प्रकारच्या कारवाया करण्यात येत आहेत.

प्रभाग दोन तर्फे राबविण्यात आलेल्या मोहिमेत कर वसुलीसाठी १२८ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या तर थकबाकी वसुलीपोटी १ लाख २८ हजार रुपये वसुल करण्यात आले. (malegaon Municipal Corporation action against tax defaulters 128 taps in city broken nashik news)

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Municipal Corporation employees disconnecting water supply in Sweeper Colony area
Nashik Film City: नाशिकमधील कलाकारांना सुगीचे दिवस; चित्रीकरणासाठी नाशिक बनले ‘फेव्हरेट डेस्टिनेशन’

कर व मुल्य निर्धारण अधिकारी हेमलता डगळे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त सचिन महाले यांच्या नियंत्रणाखाली प्रभाग समिती कार्यालय क्रमांक २ च्या कार्यक्षेत्रातील आयेशानगर, स्विपर कॉलनी व परिसरात पाणीपट्टी थकबाकी मोठ्या प्रमाणावर असल्याने याच भागात ही मोहीम राबविण्यात आली.

कारवाई दरम्यान सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत सक्तीने वसुली करण्यात आली. सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी श्याम बुरकूल, जप्ती अधिकारी संतोष गायकवाड, वरिष्ठ लिपिक फैय्याज अहमद, पुंडलिक ढोणे, वसुली लिपिक जयेश बेद, पाणी पुरवठा अभियंता मोहम्मद अली, अजय बोरसे आदींच्या पथकाने या कारवाई दरम्यान १२८ नळ जोडण्या खंडित केल्या.

शहरवासियांनी थकीत घरपट्टी व पाणीपट्टीच्या रकमेचा तत्काळ भरणा करून कटू कारवाईचा प्रसंग टाळावे असे आवाहन आयुक्त श्री. गोसावी यांनी केले आहे.

Municipal Corporation employees disconnecting water supply in Sweeper Colony area
Saundane Pir Yatra : 3 वर्षांनंतर खंडित झालेली परंपरा कायम! सौंदाणेत पिरसाहेब यात्रेत ओढल्या बारागाड्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com