Malegaon Municipal Election
sakal
नाशिक
Malegaon Municipal Election : मालेगावात राजकीय रणकंदन! ८४ जागांसाठी ८३३ उमेदवार मैदानात; युती आणि आघाड्यांचा पुरता फज्जा
Political Equations Collapse Ahead of Malegaon Civic Elections : अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे निवडणूक वातावरण अधिकच तापले आहे.
मालेगाव: येथील महानगरपालिका निवडणुकीत यंदा राजकीय गणिते पूर्णपणे बिघडली असून २१ प्रभागांतील ८४ जागांसाठी तब्बल ८३३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे निवडणूक वातावरण अधिकच तापले आहे. पूर्व भागात एमआयएम विरुद्ध सेक्युलर फ्रंट, तर पश्चिम भागात भाजप-शिवसेना आमनेसामने अशी स्पष्ट लढत दिसून येत आहे.
