Malegaon Municipal Corporation Election 2026
esakal
मालेगाव : येथील महापालिकेच्या (Malegaon Municipal Corporation Election 2026) सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, २१ प्रभागांतील ८४ जागांसाठी अंतिम ३०१ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. शुक्रवारी (ता. २) माघारीच्या मुदतीत तब्बल २२५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात आता खऱ्या अर्थाने रंगत आली आहे. शनिवारी (ता. ३) उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार असून, शहरात बहुतांशी ठिकाणी तिरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत.