Malegaon Municipal Corporation
sakal
मालेगाव: येथील महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले, तरी सेक्युलर फ्रंट सत्तेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. इस्लाम पक्षाचे ३५ व समाजवादी पक्षाचे पाच असे मिळून सेक्युलर फ्रंटकडे एकूण ४० जागा आहेत. ८४ सदस्यीय सभागृहात बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ४३ च्या जादुई आकड्यासाठी केवळ तीन नगरसेवकांची गरज आहे.