Nashik News: भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवा :आसिफ शेख

मनपा आयुक्तांना निवेदन, मनपात ६८२ पदांना मंजुरी
Officials including Asif Sheikh giving a statement to the Commissioner regarding the recruitment process in the Municipal Corporation.
Officials including Asif Sheikh giving a statement to the Commissioner regarding the recruitment process in the Municipal Corporation.esakal
Updated on

Nashik News : येथील महापालिकेतील ६८२ रिक्त पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी. यात स्थानिक बेरोजगारांना संधी मिळावी. मानधन तत्त्वावरील ५७७ कर्मचाऱ्यांना थेट नियुक्तीपत्र देवू नये अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांना निवेदन सादर केले आहे. (malegaon municipal corporation Make recruitment process transparent Asif Shaikh Nashik News)

महापालिकेतील शेकडो पदे अनेक वर्षापासून रिक्त आहेत. मानधन तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत ६८२ पदे भरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून या जागा रिक्त होत्या. शहरात असंख्य तरुण बेरोजगार असून या भरती प्रक्रियेतून त्यांना रोजगार मिळेल. भरती प्रक्रिया खुल्या पद्धतीने राबवावी. तसेच मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना थेट नियुक्ती देवू नये.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या संदर्भात शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे तरुणांना कागदपत्रे, तोंडी लेखी परीक्षेची तयारी करुन घेतली जाणार असल्याचे श्री. शेख यांनी सांगितले. ५०० तरुणांच्या स्वाक्षरीचे निवेदन आयुक्तांना सादर करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक अस्लम अन्सारी, शकील जानी बेग यांच्यासह तरुण उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Officials including Asif Sheikh giving a statement to the Commissioner regarding the recruitment process in the Municipal Corporation.
Ironman Success : मालेगाव पोलिस दलातील अजयने मिळवला ‘आयर्न मॅन’चा किताब!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.