Municipal Election
sakal
मालेगाव: येथील महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. ३०) अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांसह समर्थकांची तोबा गर्दी उसळली. एकाच दिवशी ७३७ विक्रमी अर्ज दाखल झाले. मुदतीअखेर ८३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. काही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला.