Nashik Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला पोचला आहे. अंतिम टप्प्यांत सर्वपक्षीय प्रमुख नेते आणि स्टार प्रचारक प्रचारात उतरणार आहेत. पुढील चार दिवस जिल्ह्यात व्हीव्हीआयपींचा राबता असेल. त्यामुळे यंत्रणाही अलर्ट झाल्या आहेत. पण, गेल्या आठवड्यातील प्रचाराची रंगत बघता जिल्हा प्रशासनाने हेलिकॉप्टरच्या केवळ तीनच परवानगी दिल्या आहेत.