Malegaon Municipal Election
esakal
मालेगाव : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान (Malegaon Municipal Election 2026) प्रक्रियेला आज सकाळी सुरुवात झाली असून, पहिल्या चार तासांत शहरात २०.९२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, मतदान सुरू असतानाच शहरातील रमजानपुरा भागात घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे खळबळ उडाली आहे.