Malegaon Municipal Election : अस्तित्वात येण्यापूर्वीच आघाडी बारगळली! एमआयएम स्वबळावर, तर काँग्रेस 'मविआ'सोबत
AIMIM–Congress Alliance Collapses Before Civic Polls : मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आघाडीबाबत चर्चा झाली होती, मात्र वरिष्ठ पातळीवरून विरोध झाल्याने आता दोन्ही पक्ष स्वतंत्र मार्गाने निवडणूक लढवणार आहेत.
मालेगाव: येथील महापालिका निवडणुकीसाठी ‘एमआयएम’चे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल व काँग्रेसचे महानगरप्रमुख एजाज बेग यांची आठवड्यापासून आघाडी करण्याचे सुरू असलेले मनसुबे प्रदेश काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उधळून लावले.