Malegaon Municipal Election
esakal
मालेगाव : येथील महापालिकेच्या (Malegaon Municipal Election) सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज माघारीवरून शहरातील पूर्व भागात ‘एमआयएम’च्या (AIMIM Malegaon) गटात नाट्यमय घडामोडी घडल्या. प्रभाग १३ व १९ मध्ये एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांचे खंदे समर्थक असलेल्यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे येथील प्रभाग १३ व १९ मध्ये चौरंगी लढती लक्षवेधी ठरणार आहेत.