illegal liquor seized
sakal
मालेगाव: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आचारसंहिता कक्षातर्फे कडक उपाययोजना केल्या जात आहेत. निवडणुका निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, आतापर्यंत १ लाख ७७ हजार २६० रुपयांचा अवैध मद्यसाठा व अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.