Malegaon Municipal Election
sakal
मालेगाव: येथील महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी ८४ नगरसेवकांच्या हातात शहराचा कारभार सोपविला. सभागृहात पाय ठेवण्यापूर्वीच प्रत्येक नगरसेवकाच्या डोक्यावर अपेक्षांचे ओझे आहे. हे ओझे पेलताना नवनिर्वाचित कारभाऱ्यांची चांगलीच धांदल उडेल. मुळात महापालिकेचे अंदाजपत्रक हजार कोटीच्या आसपास असले, तरी प्रत्यक्षात तिजोरीत एवढा पैसा येत नाही.