Malegaon Municipal Election
sakal
Malegaon Election Confusion : येथील महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग १० ‘क’ मधून अजब प्रकार समोर आला आहे. अपक्ष उमेदवार म्हणून नाव जाहीर झालेल्या प्रतीक्षा भूपाल भोसले यांनी ‘मी उमेदवारी अर्ज दाखलच केला नाही’ असा खळबळजनक दावा केला आहे. निवडणूक प्रक्रियेशी आपला संबंध नसून, ही अधिकाऱ्यांची चूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे, तर दुसरीकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कायदेशीर बाबी पडताळूनच हा अर्ज वैध ठरवल्याचे स्पष्ट केले आहे.