Malegaon Municipal Election
sakal
मालेगाव: राज्यात सत्तेत असलेले महायुतीतील नेते महापालिका निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लढत जनतेची सरळसरळ दिशाभूल करीत असल्याचा आरोप खासदार असदुद्दीद्दिन ओवैसी यांनी केला. मालेगाव येथे इस्लाम पक्षाचे प्रमुख व माजी आमदार आसिफ शेख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इशाऱ्यावर निवडणूक लढवत असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला.