Malegaon Municipal Election Results
esakal
Malegaon Election Results : मालेगावच्या जनतेचा ‘एमआयएम’कडून भ्रमनिरास झाला आहे. केवळ हिंदू - मुस्लिम मुद्द्यावर जातीयवाद पेरून राजकीय पोळी भाजून घेतली जात आहे. ही बाब मालेगावच्या जनतेच्या लक्षात आली. काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष असला तरी या पक्षात मुस्लिम नेतृत्व शिल्लक राहिले नाही. एमआयएमला पर्याय म्हणून मालेगावात इस्लाम पक्ष खंबीर उभा राहिला. जनतेशी निगडित जमिनीवरचे मुद्दे प्रचारात आणले.