मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनातर्फे मोर्चा

मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनातर्फे मोर्चा
Published on: 
फोटाे- 16068 मालेगाव : अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी निवेदनप्रसंगी घोषणा देताना वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी. ------ वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा मालेगावला मोर्चा कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. ९ : मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनातर्फे कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करावी, यासाठी मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनातर्फे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी संघटनेचे अध्यक्ष पापान्ना यादव, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला मोसम चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सुरवात झाली. वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फलक घेत ‘राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा विजय असो’, ‘कल्याणकारी मंडळ आमचं हक्काच’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘ज्ञानदूत वाचवा छपाई माध्यम वाचवा’ यांसह विविध घोषणा देत हातात मोर्चा काढला. रवींद्र कुलकर्णी म्हणाले, की १० ऑक्टोबर २०२४ राेजी मंत्रिमंडळच्या बैठकीत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील लाखो वृत्तपत्र विक्रेत्यांना त्याचा लाभ मिळणार होता. मात्र २४ महिने उलटूनही त्याची अमंलबजावणी झालेली नाही. त्या निषेर्धात राज्यभर वृत्तपत्र विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. वृत्तपत्र विक्रेत्यांमुळे लोकशाहीचा चाैथा स्तंभ टिकून आहे. मात्र या घटकाला आजही कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही. ऊन, वारा, पाऊस याची तमा बाळगता नागरिकांपर्यत सत्य पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र विक्रेता करतो. शासनाने लवकरच कल्याणकारी महामंडळाची अमंलबजावणी करावी; अन्यथा येत्या काळात मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील नायब तहसीलदार देंवेंद्र कुरे, संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार संजय खैरे यांना निवेदन देण्यात आले. कुलकर्णी, पापान्ना यादव, ज्येष्ठ विक्रेते विश्‍वनाथ धामणे, नंदू गवळी, राजेंद्र गवळी, दीपक यादव, नामदेव गवळी, प्रशांत कासार, प्रदीप कासार, प्रशांत गुरू कासार, दगडू बोरकर, शरद चौधरी, भिला ब्राह्मणकर, खंडू अहिरे, संजय अहिरे, संजय जगताप, संजय सूर्यवंशी, संतोष एंडाईत, रमेश पाटील, अनिल जाधव, बापू पाटील, देवेंद्र नागमोती, नरेंद्र जाधव, दत्ता गवळी, आबा सोनजे, पुष्पा यादव, रेखा कुलकर्णी, नीता गवळी, कोमल बधान यांच्यासह अनेक वृत्तपत्र विक्रेते उपस्थित हाेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com