Crime
sakal
मालेगाव: शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी मालेगाव पोलिस सरसावले आहेत. रस्त्यावर तलवारी फिरवत रील्स बनवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या येथील पूर्व भागातील गुंडांच्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळक्याची पोलिसांनी वरात काढली. नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत केले जात आहे.