मालेगाव कॅम्प- येथील मालेगाव कॅम्प भागातील जुनी पोलिस लाइन वसाहतीत ‘रात्रीस खेळ चाले चोरांचा, मद्यपींचा आणि गंजडीचा’ वावर वाढला आहे. जुनी पोलिस वसाहत ओस पडली असल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले. त्याचाच फायदा घेत मोडकळीस आलेली वसाहत मद्यपींचा अड्डा बनली आहे.